महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची व महाराष्ट्र शासनात शिक्षण मंत्री
असलेले चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले , बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ' अपमान होईल असे वक्तव केले असून बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहे महाराष्ट्र राज्यात असे वारंवार घडत असून बहुजनांच्या महाराष्ट्रातील महापुरुषांचा बद्दल होणारे अपमान थांबवावे व जे असे करतात त्यांना लवकरात लवकर पडमुक्त करावे अशी मागणी मोताळा तालुक्यातील मुस्लिम समाज संघटना कुल जमाती तहरिक द्वारा एक निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार मोताळा यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्या कडे करण्यात आली निवेदना वर जाफर पटेल सरकार , शेख सलीम याकूब , शेख जमीर , मोहसीन रफिक खान , मौलाना शाबान ऍड वसीम कुरेशी , इरफान पठाण , सादिक खान , बूडन जमादार , तस्लिम बाबा , रशीद शाह , फिरोज खान , गुफारन जमादार , शरीफ पप्पू , अब्रार खान , अझर जमीर , लाला भाई , मोहसीन खान इत्यादी ची स्वाक्षरी आहे .
