आज दिनांक 02/12/2022 रोजी पद्मश्री डॉ. वि.बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मलकापुर येथे सविंधान सप्ताह दिननिमित्त कायदे विषयक मार्गदर्श शिबिरकार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमा प्रमुख उपस्थिती श्री कुलकर्णी साहेब (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कोर्ट पाहिले) व कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी श्री अहेर साहेब ( सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कोर्ट कोर्ट दुसरे) प्रमुख वक्ता म्हणून अॅड. जी. डी. पाटील साहेब तसेच इंजीनियरिंग कॉलेज चे प्रिन्सिपल डॉ ए. डब्ल्यू. खर्चे सर, अँडमिनिस्ट्रेटीव्ह डीन डॉ ए. खर्चे सर, IQACइंचार्ज प्रोफ.आर. एम. चौधरी सर,प्रोफ. एन. जे. राजपूत सर,प्रोफ. एम. एस. तोशनिवाल सर, प्रोफ.मोहम्मद जावेद सर मंचावर उपस्थित होते.
अॅड. जी. डी. पाटील यांनी या प्रसंगी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ या विषयावर तथा अँटी रॅगींग या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले व सांगितले की सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून आपण POCSO सारख्या गुन्ह्यात कसे अडकू शकतो आणि POCSO सारखा गुन्हा कोणावर दाखल होऊ शकतो , त्यामुळे कोणती काळजी घ्यावी व देशाचे जागृक नागरिक बनावे असे मार्गदर्शन केले तसेच यावेळी न्यायाधिश श्री कुळकर्णी यांनी मुलांना प्रसंगाअनुरूप मार्गदर्शन करून व्यसनापासुन दुर राहण्याचे आवाहन केले तसेच न्यायाधिश अहेर साहेब यांनी भारतीय संविधान वर मार्गदर्शन केले व संविधान हे सर्व कायद्याची जननी असे कथन करून संविधानाचे महत्व अधोरेखीत केले.या सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कोर्ट कर्मचारी सौ. कोल्हे मैडम व मलकापुर वकिल संघ चे सदस्य अॅड मो वसीम व उदय कपले यांनी योगदान दिले
