* चार दिवसीय उर्दू पुस्तक मेळाव्याच्या अनुषंगाने उर्दू कॅलिग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३९ महिला व पुरुष सहभागी झाले होते. सर्व हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे समन्वयक इकरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक काझी जमीर आशर, शेख शकील सलीम आणि शफीक अन्सारी आहेत. या स्पर्धेत शिफा खानम हसन खान प्रथम,( अंगलो उर्दु हाई स्कूल जळगाव), तर मुहम्मद साद हकीमुद्दीन दुवितिय (इकरा हायस्कूल सालार नगर) आणि मांआयशा वसीम शेख तृतीय (इकरा शाहीन हाई स्कूल मेहरुन) या विद्यार्थ्यांनी प्रथम दुवतिय, तृतीय स्थान मिळविले. या स्पर्धेसाठी सुलेखनकार सादिक मेहरुनी आणि विद्वान गणितज्ञ व प्रसिद्ध सुलेखनकार साजिद अब्दुल रज्जाक यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख गुलाब इशाक व इफ्तिखार गुलाम रसूल यांचे सहकार्य लाभले.
