विभागीय १४ वर्षा आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये धुळे चा ओजस हिवरे तर मुलींमध्ये नाशिकची तनिष्का राठी प्रथम

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
विजयी खेळाडूंसोबत डावीकडून मीनल थोरात, मिलिंद दीक्षित, फारुक शेख व प्रवीण ठाकरे दिसत आहे.

जळगाव :-जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनाआयोजित व जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव स्पोर्ट्स हाऊस प्रायोजित १४ वर्षे आतील नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृहात करण्यात आले होते स्पर्धेत जळगाव सह धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक येथील मुलं व मुली अशा एकूण प्रत्येकी ४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील प्रथम पाच मुले व पाच मुलींना जळगाव स्पोर्ट्स हाऊस तर्फे सुवर्णपदक देण्यात आले.

 पारितोषिक वितरण समारंभ


 या विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दीक्षित, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख,राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, सोमदत्त तिवारी,माधव चव्हाण नाशिक भारत आमले यांनी काम पाहिले.

अंतिम निकाल मुले


१)ओजस राजेश हिवरे धूळे 5.5पॉईंट प्रथम क्रमांक
२)पवार अर्णव अविनाश नासिक 5पॉईंट दुसरा क्रमांक
३)सपकाळे जयेश  विजय जळगाव 4.5पॉईंट तिसरा क्रमांक
४)येवले तनिष प्रशांत नासिक 4.5पॉईंट चवथा क्रमांक
५)रोकडे ईश्वर प्रशांत नासिक 4.5पॉईंट विजयी झालेत

मुली अंतिम निकाल


१)तनिष्का अनिल राठी आंबे दिंडोरी नासिक 5.5पॉईंट पहिला क्रमांक
२)माही पंकज संघवी जळगाव 5पॉईंट दुसरा क्रमांक 
३)समृद्धी योगेश अलइ नासिक तिसरा क्रमांक 5 पॉईंट 
४)आराध्या भरत आमले जळगाव चवथा क्रमांक4.5पॉईंट 
५)कार्तिकी किरण गोसावी नासिक पाचवा क्रमांक 4.5पॉईंट.
हे सर्व खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धे साठी पात्र झाले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)