बुलढाणा आमदार माननीय श्री संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते शिवसेना मातोश्री बुलढाणा संपर्क कार्यालय कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी 

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.. 

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अंध, अपंग व मूकबधिर नागरिकांसाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर यांच्या सहकार्याने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन बुलढाणा आमदार माननीय श्री संजू भाऊ गायकवाड यांच्या  हस्ते करण्यात आले. 

ADIP योजनेअंतर्गत दिनांक ९ डिसेंबर २०२३ व १० डिसेंबर २०२३ रोजी दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आर्थिक परिस्थितीमुळे बहुसंख्या दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य जसे की कृत्रिम अवयव, व्हीलचेअर काट्या करणे यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही अशा नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्या पर्यंत पोहोचावा व शारीरिक क्षमतेवर मात करून त्यांना सर्व सामान्य प्रमाणे उन्नती करण्यात करता यावी या स्वप्नपूर्ती करता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी तसेच तज्ञ डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते....!

#सेवा_हाच_संकल्प   #ADPI  #दिव्यांग  #शिबिर #बुलढाणा  

#बुलढाणा #शिवसेना #संजय_गायकवाड

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)