देऊळगाव राजा तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगार बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या जालना, अकोला आणि जळगाव खान्देश जिल्ह्यामधून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहे. त्यामुळे दे. राजा तालुक्यातील गुन्हेगारीसोबतच रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
दे. राजा पोलिस ठाण्यांतर्गतचे दोन आणि अंढेरा पोलिस ठाण्यांतर्गतच्या एका गुन्हेगाराचा प्रस्ताव होता. देऊळगाव मही येथील अनिल सर्जेराव शिंगणे (२८) याच्यावर देशीदारूची अवैध विक्रीचे पाच गुन्हे होते. पोलिसांनी कारवाई करून सतत समज दिल्यानंतरही त्याच्यात
सुधारणा झालेली नव्हती. सोबतच लोकांवर दादागिरी करत रहिवाशांशी गैरवर्तणूक तो करत होता. देऊळगाव मही येथीलच दुसरा गुन्हेगा दिलीप विश्वनाथ फुलारे त्याच्यावर दाखल होते. याच्यावरही पाच गुन्ह्यांची नोंद आहे. अवैध दारू विक्रीसह गुंडप्रवृत्तीचा तो होता. पोलिसांनी समज देऊनही वर्तणुकीत फरक पडला नव्हता. तिसरा व्यक्ती हा अंढेरा पोलिस ठाण्यांतर्गत बायगाव बुद्रुक येथील प्रवीण दिनकर नागरे (30) हा आहे. त्याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. रेतीची अवैध वाहतक. तसेच दादागिरी करून पकडलेले टिप्पर पळवून नेत तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल होते.
गावातील व परिसरातील नागरिकही त्यांना त्रस्त झाले होते. त्यामुळे या तिघांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तिघांनाही बुलढाणा, जालना, वाशिम आणि जळगाव, खान्देश जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी त्यांना हद्दपार करण्यात आले आले आहे. ९ डिसेंबर रोजी हा आदेश देण्यात आलेला आहे.
चौकट
*गेल्यावर्षीही झाली होती तडीपारीची कारवाई*
गेल्यावर्षीही रेतीमाफियांनी उच्छाद मांडला होता. तालुक्यातील सामाजिक स्वास्थ्य गुन्हेगारीमुळे बिघडण्याची भीती होती. त्या पार्श्वभूमीवर एसडीओ भुषण अहिरे यांनी सिदखेड राजा उपविभागाचा पदभार स्वीकारताच बुलढाणा व आलना जिल्ह्यातून दोघांना हद्दपार केले होते. त्यानंतरचा हा दुसरा तडीपरीचा आदेश आहे.
