लोणार येथील पुन्हा एक नामवंत व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड; हाजी उस्मान शेठ यांचे निधन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

लोणार तालुका प्रतिनिधी

     लोणार येथील प्रतिष्ठित नागरिक तथा लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल व उस्मानिया हॉस्पिटल आणि युनानी मेडिकल कॉलेज लोणारचे संस्थापक अध्यक्ष शेख उस्मान शेख हिराजी उर्फ उस्मान शेठ यांचे काल ६ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान वृद्धापकाळाने वयाचे ८८ वर्षात दुःखद निधन झाले आहे.  त्यांच्या निधनामुळे शहरभरात शोककळा पसरली आहे. लोणारकरांना अवघ्या २० दिवसाच्या कालावधीत हा दुसरा दुःखद झटका बसला आहे.


 उस्मान शेठ हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे, मन मिळाऊ व सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांची दफन विधी ७ डिसेंबर २०२२ रोजी ११ वाजता लोणार येथे संपन्न झाली. हिंदू-मुस्लिम सर्वांसोबत त्यांचे संबंध असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत मुस्लिम समाजा सोबतच बहुसंख्येने हिंदू बांधव दफनविधी संपेपर्यंत कब्रस्तान मध्ये उपस्थित होते. अनेक चाहत्यांनी त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्याकरिता आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.

  अतिशय सामान्य परिस्थितीला मात करून यशाचे शिखर गाठणारे उस्मान सेठ यांची महाराष्ट्र भरातील मुस्लिम व विशेषता: कुरेशी/खाटीक समाजा मध्ये एक विशेष प्रतिष्ठा होती. त्यांनी लोणार शहरातील व परिसरातील विद्यार्थ्याकरिता अनेक शैक्षणिक संस्थांचे स्थापना करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. लोणारच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असतो. उस्मान शेठ हे मा.नगर सेवक हाजी महेमूद सेठ यांचे काका तथा मा.न.सेवक तथा डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल, कला व विज्ञान महाविद्यालयचे अध्यक्ष हाजी मसूद सेठ यांचे वडील होते. 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)