कापूर:- मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सोपान नीना घोंगे वय 50 वर्ष राहणार देवधाबा या शेतकऱ्याने शेतामध्ये काही उगवत नसल्याने व बँकेचे कर्ज असल्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. असे ग्रामस्थांन मध्ये बोलल्या जात आहे. ही घटना त्यांची पत्नी घरी आल्यानंतर उघडकीस आली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनाकरिता पाठवला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
