धावत्या कारने घेतला पेट

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव नवीन बसस्थानक परिसरातील गांधी उद्यानाजवळ बुधवारी दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत गाडीचे इंजिन जळाले असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शिरसोली येथील बद्रिनाथ जगन्नाथ पाटील हे मित्राची कार (एमएच.०५. एजे. ०६४६) घेऊन बुधवारी जळगावात बँकेच्या काही कामानिमित्त आले होते. दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास काम आटोपून ते शिरसोलीकडे निघाले होते. गांधी उद्यानाजवळून जात असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. पाटील यांनी लागलीच कारच्या बाहेर धाव घेतलीआणि इतर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांतच मनपाचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र आगीत इंजिन जळाले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)