जलगांव येथील होराइजन बहुउद्देशीय संस्था तर्फे अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात.....*.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
*  दि.19.12.20220 जळगाव :- संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात 18 डिसेंबर हा अल्पसंख्याक  हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, परंतु देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये याविषयी माहिती नसल्यामुळे हा दिवस फक्त सरकारी दप्तरा मध्य कागदावरच साजरा करण्यात येत होता, परंतु मागील दोन तीन वर्षा मध्ये याविषयी थोडीफार जनजागृती झाल्यामुळे यावर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस हा सरकारी व गैरसरकारी संस्थांमार्फत उत्सवात साजरा करण्यात आला याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरातील होरायझन बहुउद्देशीय संस्था तर्फे 18 डिसेंबर संध्याकाळी आठ वाजता साला नगर मधील मूनवर स्टेडी सेंटर मध्य एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस दिवसात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहर ए काजी मुफ्ती अतीकुल रहमान हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर पत्रकार आनंद शर्मा, मोटिवेशनल स्पीकर व होराइजन बहुउद्देशीय संस्थेचे संचालक डॉक्टर राबीब बहादुर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सलीम इनामदार उर्दू टाईम चे पत्रकार सईद पटेल, अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्टचे युसुफ शाह तसेच पत्रकार अकील खान ब्यावली इत्यादी उपस्थित होते, यावेळी आपल्या अध्यक्षय भाषणामध्ये शहर ए काजी मुफ्ती अतिकुल रहेमान यांनी अल्पसंख्याक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल यावर आपले विचार मांडले तर राष्ट्रवादी अल्पसंख्या विभागाचे सलीम इनामदार यांनी विविध शहरांचा रस्त्यांना, शाळांना, भाग-बगीच्यांना तसेच सार्वजनिक मालमत्त्यांना अल्पसंख्याक समाजातील स्वतंत्र सेनानी यांचे नाव द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला या लोकांनी केलेल्या कार्य बदल जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल, तसेच आप तक न्यूज चॅनलचे प्रमुख आनंद शर्मा यांनी आपले विचार व्यक्त करताना अल्पसंख्याक समाजा तील लोकांनी स्वतःला अल्पसंख्याक म्हणून कमजोर असल्याचा भास न करता, आपणही बहुसंख्य समाजासारखे या देशातील नागरिक आहोत व आपल्यालाही सर्व समान अधिकार आहे हे लक्षात घेऊन स्वतःच्या, समाजाच्या व देशाच्या विकासासाठी प्रयत्नशिल असणे गरजेचे आहे, या कार्यक्रमाच्या  आयोजना साठी केलेल्या परिश्रमामुळे समाजात एक चांगला संदेश जाईल व अल्पसंख्याक हक्क दिवस यापुढे अजून उत्साहात साजरा होईल हे सत्य असून त्या साठी आयोजकांचे अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष युसुफ शाह आणि पत्रकार आनंद शर्मा यांनी आयोजकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व आभारही मानले, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तबरेज शेख, मुस्ताक भिस्ती, इरफान शेख, रेहान अन्सारी व मुनवर स्टेडी सेंटर च्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले., कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक डॉक्टर रगिब बहादूर यांनी सर्वांना उपस्थित त्यांना आयपीएस अब्दुल रहमान लिखित "सच्चर की सिफारिशे" हि हिन्दी अनुवादित पुस्तक भेट दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिया बागवान यांनी तर आभार प्रदर्शन इरफान शेख यांनी केले......

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)