जळगाव : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या बऱ्हाणपूरच्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता अजिंठा चौफुली परिसरात अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून,याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी अजिंठा चौफुली परिसरात दोन तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत होते. ही माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विकास सातदिवे यांना मिळाली. त्यांनी लागलीच ही बाब पोलिस निरीक्षकांना कळविली. स्वतंत्र पथक तयार करून कारवाईसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी अजिंठा चौफुली गाठून दोन्ही तरुणांकडून एक गावठी पिस्तूल जप्त केली. अक्षय प्रकाश घारू (२१) व नितीन देविदयाल सालवे (२५, दोन्ही बऱ्हाणपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

.jpg)