जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू...! *भुसावळ प्रतिनिधी जुबेर मन्यार*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

जामनेर : जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धनराज श्रीराम माळी (32) असे मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.



निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या केल्याच त्यांच्यावर पराभूत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे 20- 25 जणांना ताब्यात घेतले असून गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.



गावातील विजय मिरवणूक सुरू असताना यादरम्यान पराभूत पॅनलचे कार्यकर्ते व विजयी पॅनलचे कार्यकर्ते हे समोर आल्याने झालेल्या हाणामारी व दगडफेकीत यात धनराज माळी याचा मृत्यू झाल्याची ही चर्चा आहे. दरम्यान, धनराज हे दगडफेकीत जखमी झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच मृत्यू ओढवला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)