बोदवड शहरातील नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने आ. एकनाथ खडसेंना जोरदार धक्का बसला आहे. नगरसेवक हकीम बागवान , नगरसेवक मुजम्मील शाह , नगरसेवक लतीफ शेख , मुजफ्फार शाह यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी बंगल्यावर जाहीर प्रवेश केला. बर्याच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरद पवार गट) नगरसेवक शिवसेने मध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. आता आ. एकनाथ खडसेंच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांचे शिवसेनेत प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिला ( शरद पवार गट) खिंडार पडले आहे. एकीकडे आज दिनांक 13 रोजी आ.एकनाथ खडसेंचा बोदवड दौरा पार पडलेला असतांना दुसरीकडे निकटवर्तीय नगरसेवकांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा धक्का देणारा आहे. उर्वरित नगरसेवक लवकरच खडसेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा जोर धरुन आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदा पाटिल , उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक सुनिल बोरसे , नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक प्रितेश जैन , नगरसेवक हर्षल बडगुजर , शिवसैनिक अमोल व्यवहारे आदि उपस्थित होते.
