पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर मार्गदर्शन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर – पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात "स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी?" या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे सीजीपी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॅनरा बँक, मलकापूर शाखेचे व्यवस्थापक श्री. नितीश बोरकर होते.

कार्यक्रमादरम्यान श्री. बोरकर यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या प्रभावी अभ्यासपद्धती, वेळेचे व्यवस्थापन, यशस्वी रणनीती, तसेच परीक्षेतील संधी आणि आव्हाने याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि महत्त्वपूर्ण शंका विचारून आपल्या ज्ञानात भर घातली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, आंक्यूएसी समन्वयक प्रा. आर. एम. चौधरी, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. युगेश खर्चे, विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. योगेश सुशीर तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. निलेश बुडुखले, प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. अमोल हलदे, प्रा. निलेश बुंधे, प्रा. जितेंद्र हनुमंत आणि प्रा. तेजल खर्चे, प्रा. फातेमा सरकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे श्री. नितीश बोरकर सरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या मोलाच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यांचे व्यावहारिक दृष्टिकोन, व्यावसायिक अनुभव, तसेच विद्यार्थ्यांसाठी दिलेले अमूल्य मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी ठरले.
महाविद्यालयाच्या वतीने भविष्यातही अशाच प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींबाबत सखोल माहिती मिळेल आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शन मिळेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ कोलते व सदस्य श्री. पराग पाटील यांनी यावेळी केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)