मलकापुर :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर यांनी दुधलगांव (निपाना),वाकोडीसह इतर गावे दत्तक घेतली असून गावातील तरुण उद्योजकांना व शैक्षणिक विद्यार्थ्यांना बिजनेस लोन व एज्युकेशन लोन देण्यास बँक मॅनेजर नेहमी कारणे दाखवत असतात व खूप शेतकऱ्यांचचे खाते बँकेने होल्ड केले असल्याने शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आज दि.12 मार्च रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, तालुका प्रमुख दिपक चांभारे, शहरप्रमुख गजानन ठोसर यांचे नेतृत्वात शिवसैनिक व शेतकऱ्यांनी बॅक मॅनेजर यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी
बँक मॅनेजर यांनी उपस्थित शेतकऱ्यांची आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स घेऊन हातोहात होल्ड झालेले बॅक खाते सुरू केली, उर्वरित होल्ड झालेली बॅक खाते हि लवकरात लवकर चालू करून देण्यात येतील व ग्राहकांना कर्ज देण्यास बँक राहणार असल्याचे सांगितले यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, उपशहर प्रमुख समद कुरेशी, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी नगरसेवक पांडुरंग चीम, श्याम जाधव, चाॅद चव्हाण,विश्वनाथ पुरकर,विभाग प्रमुख राजेंद्र काजळे, विभाग प्रमुख गणेश सुशीर ,दीपक कोथळकर, मोहम्मद रफीक अकील गौरी ,सै. तौफिक, एजाज भाई, शेख युसुफ,शेख इरफान, वासुदेव भोळे,दीपक सरोदे अकील चव्हाण, रफिक भाई, मो. रफीक साबीर खान, सत्तार शहा सह मलकापूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.
