अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीचे के वाय सी करूनही मदत मिळेना, पैसे गेले कुठ स्वाभिमानीचा आरोप तात्काळ पैसे द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचा इशारा.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

दि.23 एप्रिल, मलकापूर: अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे के वाय सी सर्व करून महिना उलटून गेला तरीही सरकार पैसे टाकायचं नाव नाही. नेमकं शासनाला व प्रशासनाला शेतकऱ्यांन सोबत खेळायचं आहे का असा प्रश्न निर्माण झालाय काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले काही शेतकऱ्यांना पैसे आले नाही यात पैसे कोणी खाल्ले का असा पण प्रश्न निर्माण होतो. सपूर्ण शेतकऱ्यानं मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तत्काळ दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावी अन्यथा स्वाभिमानी स्टाईल ने दणका देण्यात येईल असा इशारा देण्यात आला या वेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, पकक्षाचे तालुका अध्यक्ष नांदुरा रामदास वाघ, संघटनेचे तालुका अध्यक्ष रामदास डोसे, युवक तालुकाध्यक्ष गोलू पाटील, निंबाजी तायडे इत्यादी कार्यकर्ते हजर होते..

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)