लेझीम आणि हलगीच्या गजरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना गावातील नागरिकांकडून कौतुक
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर संपूर्ण जगामध्ये १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंती निर्मिती अभिवादन करताना विविध उपक्रम राबवतात आणि बाबासाहेबांना मानवंदना देतात मलकापूर तालुक्यामध्ये पावसात जयंती साजरी करण्यात आली संपूर्ण मलकापूर नगरी मध्ये सकाळी मोटरसायकल रॅली भव्य भीम गीतांचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम मलकापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते त्यातच घिर्णी गावातील महिलांनी पारंपारिक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली
बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.
आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.
