सावधान आता आरोग्य उपकेंद्रात महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणारे टवाळखोर, दारुडे सीसीटीव्ही कॅमेरेच्या नजर कैदेत
मलकापुर:- तालुक्यातील नरवेल येथील आरोग्य उपकेंद्रात महिला कर्मचाऱ्यांना टवाळखोर, दारुडे नेहमी त्रास देत असल्याने या उपकेंद्रात सुरक्षा गार्ड सह आरोग्यसेविका, एन एम ओ पी डी एम ची मागणी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत व शहर प्रमुख गजानन ठोसर यांनी एका निवेदनाद्वारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा जैन यांच्याकडे केली होती तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्या निवेदनाची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा जैन यांनी आज येथील नवीन आरोग्य उपकेंद्रात नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून आता या सि.सि.टिव्ही कॅमेऱ्या मुळे टवाळखोर व दारुड्यांचा महिलांना त्रास कमी होणार आहे.शिवसेना (उ.बा.ठा) च्या निवेदनाची दखल घेत दसरखेड एमआयडीसी पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य उपकेंद्रात पेट्रोलिंग साठी ड्युट्या तैनात केल्या आहेत.
