कोथळी (ता. मोताळा): दिनांक २० जुलै २०२५ जिल्हा परिषद उर्दू उच्च माध्यमिक शाळा, कोथळी येथील मुख्य गेटजवळ दूषित नालीच्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डबके साचले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे बी. अँड सी. रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना या डबक्यांमधूनच ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.कारण साचलेल्या पाण्यात मच्छर आणि डासांची पैदास होत असून,त्यापासून मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
व शाळेच्या समोरील भीतीला लागूनच ग्रामपंचायत मार्फत कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी कचराकुंडी बनवण्यात आली असून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ठीक साचलेले असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे कचरा कुंडी कचऱ्यामुळे पूर्ण भरलेली असल्यामुळे अक्षरशा कचरा हा रोडवर सांडत असून सदर कचऱ्याची कोणत्याही प्रकारची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही
त्यामुळे सध्या कचरा कुंडीचा घान व सडका का वास येत असून त्याला लागूनच शाळेचे किचन सेट आहे विद्यार्थ्यांसाठी भोजन बनविताना दुर्गंधीत वासाचा श्वास घेताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे व त्या ठिकाणाहून जात असताना श्वास घेताना त्रास व तोंडाला रुमाल बांधावे लागत आहे शिवाय हा मुख रस्ता कोथळी ते मोताळा बस स्टँडला जोडणारा मुख्य मार्ग असून, या रस्त्यावर नेहमी वाहनाची मोठ्या प्रमाणात असंख्य वाहनाची गर्दी असते मोताळा येथे तहसील, पंचायत समिती, कोर्ट, रुग्णालय आणि उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डबक्यांमधील चिखल आणि पाणी वाहनांमुळे उडाल्याने भांडणे आणि अप्रिय घटनाही घडण्याची शक्यता आहे.स्थानिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु, हा रस्ता बी. अँड सी. विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून ग्रामपंचायत हात वर करते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.उपाययोजना:तातडीने रस्ता दुरुस्ती: बी. अँड सी. विभागाने तात्काळ या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी. आवश्यक असल्यास नवीन रस्ता बांधावा.नालीची स्वच्छता आणि व्यवस्थापन: दूषित पाण्याचा निचरा होण्यासाठी नालीची नियमित स्वच्छता करावी आणि पाण्याचा योग्य निःसारणासाठी व्यवस्था उभारावी.मच्छरनियंत्रण: साचलेल्या पाण्यावर औषध फवारणी करून मच्छरांची पैदास रोखावी आणि आरोग्य विभागामार्फत परिसरात जनजागृती करावी.स्थानिक प्रशासनाची जबाबदारी: ग्रामपंचायत आणि बी. अँड सी. विभागाने समन्वय साधून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे.नागरिकांचा सहभाग: स्थानिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा.नागरिकांचे आवाहन: प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा गावातील शाळा व्यवस्थापन समिती पालक मंडळी व गावातील सुसज्ञ व जागरूक नागरिकांच्या वतीने देण्यात आला त्यावेळी गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कादर खान इस्माईल खान , शेख अफसर शेख अकबर (पत्रकार )
सय्यद इमरान सय्यद गफ्फार ,जाबीर भाई ,शेख इब्राहिम ,करीम खाँ शब्बीर खा, इम्रान शाह हुसेन शहा , मुर्तुजा भाई, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
