मुक्ताईनगर(प्रतिनिधी)वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईल प्रदर्शन थांबवा, सविस्तर वृत असे की,११ जुलैपासून भारतातील सिनेमागृहात *उदयपूर फाईल* प्रदर्शित होणार असल्याने या सिनेमामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच इस्लाम व मुस्लिम समाजाच्या विरोधात या सिनेमाद्वारे विष ओकला गेल्याने भारतीय न्याय संहिता कलमाचे तसेच भारतीय घटनेचे सुद्धा उल्लंघन होत असल्याने हा सिनेमा प्रदर्शित करू नये कारण उदयपूर फाईलच्या तीन मिनिटाच्या ट्रेलर द्वारे हा सिनेमा इस्लाम व मुस्लिम विरोधात असून त्यात न्यायालयिन प्रविष्ट ज्ञान व्यापी मशिदीचा सुद्धा उल्लेख आहे.एवढेच नव्हे तर भारतीय मुस्लिम विद्वान उलमा यांना ही आतंकवादी दाखविले आहे.एवढेच नव्हे तर इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) व माता आयशा यांच्या बाबत सुद्धा अश्लील टिपणी केलेली आहे.व सदर सिनेमा मध्ये *सर तन से जुदा* हे वाक्य पूर्णपणे प्रदर्शित केले असून हे वाक्य जर कोणी मुस्लिम व्यक्तीने सभेत अथवा रॅली द्वारे बोलल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येते त्यामुळे या सिनेमांमध्ये सुद्धा तेच वाक्य प्रसिद्ध केल्याने तसेच इतर सर्व बाबी या असंविधानिक असल्याने त्यावर त्वरित बंदी आणावी व कायदेशीर कारवाई करावी या मागणी चे निवेदन मा. राष्ट्रपती भारत सरकार यांना तहसीलदार मुक्ताईनगर यांचे द्वारे देण्यात आले यावेळी जळगांव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, महाराष्ट्र अल्पसंख्याक कार्य अध्यक्ष अफसर खान, लाल खा, तौकीर अहमद,अरबाज खान,अकिल शेख, मुश्ताक मणियार, नासिर खान, शरीफ सैय्यद, हकीम हमीद मणियार,मजीद ठेकेदार, अहमद ठेकेदार, आदी समाज बांधव उपस्थित होते
