ढोरपगाव तालुका खामगाव येथे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहात स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला

या स्वतंत्र दिनानिमित्त सर्व प्रथम गावातून प्रभात फेरी  काढण्यात आली प्रभात फेरी साठी गावात रांगोळ्या काढून स्वागत केले 
तसेच गावात प्रत्येकांच्या घरावर तिरंगा लावण्यात आला 
प्रभात फेरी काढताना विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छतेसाठी घोषणा करण्यात आल्या 
गावातून प्रभात फेरी काढल्यानंतर ग्रामपंचायत च्या वतीने तसेच जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले 
ग्रामपंचायत मध्ये सरपंच पण मला ताई संदीप मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण शाळा समिती अध्यक्ष प्रमोद मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले 
ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले 
सदर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा समितीचे सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले 
 यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तसेच विद्यार्थ्यांनी भाषण केले 
स्वतंत्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वीज स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता 
सहभाग विद्यार्थ्यांना तसेच  प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले 
स्वतंत्र दिनानिमित्त या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व शिक्षक वृंद शाळा समिती सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिराती  साठी संपर्क 

राहुल पाटील मुंढे

9423760528

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)