मलकापूर (प्रतिनिधी) :
मलकापूर नगरपरिषदेतील जन्म दाखल्यांच्या विषयावर “बांगलादेशी” असा उल्लेख करून जातीय तेढ निर्माण करणारी व दिशाभूल करणारी बातमी प्रसारित केल्याबद्दल साम टीव्ही आणि टीव्ही-9 या वृत्तवाहिन्यांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित वृत्तवाहिन्यांनी कोणताही पुरावा न देता अपप्रचार केल्याने शहरात गैरसमज पसरू शकतात आणि सामाजिक सौहार्द धोक्यात येऊ शकते.
या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसादराव जाधव, ॲड. शोएब शेख, बाळू पाटील, रफिक खान, राजूभाऊ डोफे, राजूभाऊ साठे, राहुल जाधव, संदीपसिंह राजपूत, शिवाजीभाऊ घुले, विजुभाऊ वानखेडे, इमरान शेख, प्रा. नरेंद्र सुरडकर, अफरोज खान, तन्वीर शेख, सरफराज खान, अलीम शेख, सलमान खान, आणि हरीश टेकाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
