नगरपरिषद निवडणूक पत्रकारांना प्रवेश पास देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 



मलकापूर प्रतिनिधी

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून मतमोजणी केंद्रात पारदर्शकता राखण्यासाठी पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यांचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र मागील निवडणुकांमध्ये पत्रकारांना प्रवेश पास न दिल्यामुळे माहिती देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही स्थिती यंदा निर्माण होऊ नये, यासाठी हिंदी मराठी पत्रकार संघ तर्फे अधिकृत लेखी निवेदन करण्यात आले आहे.



 हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, नगर परिषद मलकापूर यांना निवेदन पाठविले दिले.



या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण सचित्र आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना पास देणे अत्यावश्यक आहे. अनेकदा प्रशासनाच्या सूचनांमुळे पत्रकारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे सत्य घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यात विलंब होतो. प्रवेश पास देण्यासंदर्भातील अटी अत्यंत जाचक असून त्यामुळे अनेक पत्रकार प्रवेशापासून वंचित राहतील त्यामुळे याचा परिणाम वृत्तांकनावर होणार असून नमूद केलेल्या जाचक अटींना शिथिल करत सर्व पत्रकारांना व मीडिया प्रतिनिधींना पास देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले.



पत्रकार संघाने निवेदनात विशेष नमूद केले आहे की “मतमोजणी केंद्रात पत्रकारांचा प्रवेश बंद ठेवणे म्हणजे पारदर्शकतेस बाधा येणे होय. त्यामुळे पत्रकार व मीडिया प्रतिनिधींना योग्य त्या संख्येने तत्काळ प्रवेश पास देण्यात यावेत.”



पत्रावर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, वीरसिंग दादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार, अजय टप विदर्भ उपाध्यक्ष, राजेश इंगळे, सतीश दांडगे विदर्भसचिव, श्रीकृष्ण तायडे जिल्हाध्यक्ष, सुधाकर तायडे तालुका अध्यक्ष, मनोज पाटील, समाधान सुरवाडे, गौरव खरे, स्वप्निल आकोटकर, अनिल गोठी, शेख जमील पत्रकार प्रकाश थाटे उल्हास शेगोकार, शेख निसार, नथूजी हिवराळे, बळीराम बावस्कार, निलेश चोपडे, मयूर लड्डा, प्रभाकर इंगळे, पंकज मोरे, प्रसन्न व्यवहारे, यांची सह्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



सदर निवेदनानंतर पत्रकारांच्या प्रवेशाबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)