इकरा, थीम महाविद्यालयाची विकास,जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ येथे प्रकल्प भेटीचे आयोजन. जळगाव: इकरा एच.जे.थीम महाविद्यालयाच्या

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 प्राणिशास्त्र विभागा अंतर्गत विकास जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ जळगाव येथे  दुध प्रकल्प भेट आयोजित करण्यात आली होती.  दुध प्रकल्प भेटीसाठी तृतीय वर्ष बी.एस्सीचे एकूण २३ विद्यार्थी व ३ शिक्षक उपस्थित होते. प्रकल्प भेटी दरम्यान दुध प्रकल्प प्रशासकीय अधिकारी श्री.ब्रम्हे, प्रकल्प संचालक श्री.चौधरी, श्री.पाटील, आणि अपूर्वा वायकोळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दुध, तुप, लोणी, ताक, दही इ. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती प्रक्रिया विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
         शैक्षणिक दुध प्रकल्प भेट आयोजन केल्याबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार, उपाध्यक्ष डॉ.इक्बाल शहा, एजाज अब्दुल गफार मलिक, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य  पिंजारी आय.एम. यांनी अभिनंदन आणि कौतुक केले. तसेच उपप्राचार्य डॉ.युसुफ पटेल, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शेख हाफिज, आरिज शेख आणि बाबा पटेल यांनी योगदान दिले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)