बुलडाणा-मलकापूर महामार्गावर राजूर जवळ हॉटेल मध्ये तोडफोड करून मालकाला लुटण्याचा आरोप

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

बुलडाणा-मलकापूर महामार्गावर राजूर जवळ हॉटेल मध्ये तोडफोड करून मालकाला लुटण्याचा आरोप
मामु का ढाबा" वर भ्याड हल्ला करून बाप-लेकाला तथाकथित दरोडेखोर टोळक्याने केली बेदम मारहाण
बुलडाणा - 28 जानेवारी
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथील दरोड्याचा घटना ताजी असतांनाच मोताळा तालुक्यातील राजूर जवळ हॉटेल आनंद सागर जे "मामु का ढाबा" म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे या हॉटेल मध्ये तथाकथित दरोडेखोर टोळक्याने मालकाला लुटण्याचा प्रयत्न केला परंतु मालकाने विरोध केल्याने हॉटेलची तोडफोड व मारहाण करण्यात आल्याची घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
      या बाबत प्राप्त माहिती नुसार 28 जानेवारीच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास 2-3 मद्यधुंद तरुण हॉटेल मध्ये आले व दहशत निर्माण करत काउंटरवर जोराने लोखंडी रॉड मारला व गल्ल्यातून पैसे लुटण्याचा प्रयत्न करू लागले,हॉटेल मालक उमर शाह रा.कोथळी यांनी व त्यांच्या मुलाने विरोध केलं असता मुलाला डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केली व दहशत निर्माण केली. यावेळी हॉटेल मध्ये जेवायला आलेल्या काही लोकांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असता दरोडा टाकण्यासाठी आलेल्या या दरोडेखोरांनी आपल्या 25-30 साथीदारांना फोन करून बोलावून घेतले व या गावगुंड टोळक्याने हॉटेल मध्ये गोंधळ घालून नासधूस करत खुर्च्या-टेबल व इतर साहित्याची तोडफोड करत हॉटलचे मोठे नुकसान केले.हा धिंगाणा सुरू असतांना काहींनी बोराखेडी पोलीस व पोलीस हेल्पलाईन 112 वर संपर्क करून मदत मागितली परंतु पोलीस उशिरा घटनास्थळी दाखल झाली तो पर्यंत या दरोडेखोर गांवगुंडांनी हॉटेलचे मोठे नुकसान करून पसार झाले होते.पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून या हल्ल्यात जखमीला मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकलसाठी नेल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेचा व्हीडिओ देखील समोर आलं असून ज्यात तथाकथित गावगुंड दरोडेखोर दहशत माजवत हल्ला करतांना दिसत आहे.या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू होती.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)