जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुका साहित्यिक सांस्कृतिक मंडळ द्वारा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त तेरावे जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन 18 डिसेंबर रोजी शहरातील एकलव्य माध्यमिक विद्यामंदिर शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले असून साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष डी डी पाटील सर यांनी केले आहे याविषयी माहिती देताना साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष डी डी पाटील म्हणाले की संमेलनाच्या अध्यक्षस्थानी येथील प्रसिद्ध साहित्यिका मायाताई दिलीप धुपड या राहणार असून प्राध्यापक वासुदेव वले सर (श्री शेट एम एस साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
याप्रसंगी जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष साधना महाजन स्वागत अध्यक्ष एडवोकेट शिवाजी सोनार जितेंद्र पाटील दीपक पाटील डॉक्टर शिरीष पाटील डॉक्टर अमोल शेठ पी के पाटील जेके चव्हाण नाना लामखेडे ताराबाई कोठारी मोहन भाई पंपनापी चंद्रशेखर पाटील डॉक्टर आशिष महाजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे या संमेलनात राजेश पाटील यांच्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे तसेच श्रद्धेय लिखित भवरलालजी जैन लिखित ती आणि मी आत्मकथन हृद्य गतावर व्याख्याते ज्ञानेश्वर शेडे संवाद साधणार आहेत संमेलन अंतर्गत निमित्रांचे कवी संमेलन होणार असून या जिल्हाभरातील 40 कवी सहभागी होणार आहे समारोपीय सतरा मध्ये जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मानवांच्या हस्ते गौरवल्या जाणार आहे ग्रंथ लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार असून विजेत्यांना लेखकांच्या साहित्य संस्कृत मंडळातर्फे स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे जिल्हाभरातील कवी नवोदतीत साहित्यिक वाचक लेखकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान जामनेर तालुका साहित्यिक सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी डी पाटील उपाध्यक्ष मधुकर पांढरे सचिव गोरख सुर्यवंशी जितेंद्र गोरे सुखदेव महाजन प्रतिभा नरवाडे ज्योती पाटील विनोद जाधव प्राध्यापक शांताराम जाधव श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी केले आहे

