राज्यात ७५हजार शिक्षकांची भरती करणार - शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर साहेब* शासन मान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 या संघटनेचे जागतिक अपंग दिनानिमित्त राज्यस्तरीय

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* कार्यशाळा, दिनांक ५ डिसेंबर रोजी भाग्यलक्ष्मी सभागृहात अलिबाग येथे पार पडले. कार्यशाळेचेअध्यक्ष मा.आमदार महेंद्र दळवी साहेब , स्वागत अध्यक्ष मा. आमदार भरतशेठ गोगावले साहेब  ,आदरणीय प्रमुख पाहुणे - महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री . आदरणीय दिपकजी  केसरकर साहेब यांनी मार्गदर्शन करतांना दिव्यांग कर्मचारी यांच्या मागण्या व निवेदन संदर्भात सांगितले की, दिव्यांग शिक्षक  यांच्या बदली 20 ची अट तसेच बदली कायदा मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे बैठक लावुन सर्वच प्रश्न मार्गी लावणार हे आश्वासन त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले. तसेच शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच दिव्यांगांचे स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य आहे.आमदार भरतशेठ गोगावले यांनी ५१०००हजार रुपये बक्षीस दिले दिव्यांग सेवा हीच ईश्वरसेवा आहे हे मानून मी दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द राहणार .तसेच दिव्यांगांच्या मागण्या आहेत त्या सोडविणार आहे. अपंग वाहन भत्ता दुप्पट दराने लागू करावा, अपंगाचे सरळ सेवा, पदोन्नती ४ टक्के प्रमाणे,दिव्यांगाचे मानधन ५००० रुपये करावे, दिव्यांगासाठी५ टक्के राखीव निधी ठेवावा, दिव्यांग कर्मचारी यांची मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, दिव्यांग कर्मचारी आघाऊ वेतन वाढ मंजूर करावी, अशा विविध मागण्यांची चर्चा करून  पूर्ण करण्यात येतील , असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले . मंत्रालयात  बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत . कार्यक्रमाला अलिबाग न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यकार्यकारी अधिकारी , आदरणीय किरण पाटील साहेब, राज्य संघटनेचे संस्थापक - अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील अध्यक्ष रविंद्र पाटील ,साईनाथ पवार सर , सचिव परमेश्वर बाबर साहेब, ललित सोनवणे, वकील अग्रवाल साहेब ,आर. टी. सैंदाणे, भास्कर कुवर, बुलडाणा जिल्हासचिव -  किशन केने मानेगावकर, जिल्हा कोषाध्यक्ष सुरेशजी जगताप साहेब, हिंगे साहेब,  भोलाने साहेब, खंडारे साहेब आदी बुलडाणा जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)