धान्यपासून वंचित ठेवण्यात येत असल्याने याबाबत उचित कार्यवाही करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी मागणी वयोवृध्द नागरीक करीमखान आमदखान रा.कुरेशनगर, पारपेठ यांनी आज १२ डिसेंबर रोजी तहसीलदार मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी वयोवृध्द असून माझे वय अंदाजे ८० वर्षाच्या जवळपास झाले आहे. वयोमानानुसार माझ्या अंगठ्याच्या रेषा ह्या मिटल्या असल्यामुळे मला शासनाच्या वतीने देण्यात येणार्या राशनचे धान्य संबंधीत राशन धान्य दुकानदार देण्यास मनाई करीत आहे. माझ्या कुटुंबामध्ये मला मुलगा नसल्याने व माझ्या पत्नीचे निधन झाले असल्याने आजरोजी एकटाच राहतो. त्यातच माझे वय ८० वर्षे झाले असल्याने मी संपूर्णत: शासनाकडून मिळणार्या धान्यावरच अवलंबून आहे. त्यातच गेल्या काही महिन्यापासून माझे राशन धान्य ठसे उमटत नसल्याने बंद करण्यात आल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. धान्यच मिळत नसल्या कारणाने मला दुसर्यांसमोर हात पसरविण्याची वेळ आली आहे.
कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये या उदात्त हेतूतून शासनाकडून सदरची योजना राबविण्यात येते. मी माझ्या या समस्ये बाबत संबंधित राशन दुकानदाराकडे वैâफियत मांडली असता त्यांनी मला मोबाईल वरून आधार कार्ड अपडेट करण्याबाबत सांगितले. मात्र मी अत्यंत गरीब परिस्थितीत आयुष्याचे शेवटचे क्षण जगत आहे. त्यातच परिस्थितीमुळे मोबाईल घेणे व त्या मोबाईलच्या सिमकार्डच्या रिचार्जचा प्रत्येक महिन्याचा खर्च भागविणे मला शक्यच नाही. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर आपण आपल्या स्तरावर योग्य तो मार्ग व तोडगा काढून मला प्रत्येक महिन्याला नियमानुसार मिळणारे धान्य देण्याबाबत उचित अशी कार्यवाही करावी व गेल्या काही महिन्यांपासून न मिळालेले धान्य सुध्दा मला देण्याबाबत संबंधित रेशन दुकानदारास आदेशित करावे. जेणे करून मला दुसर्यांसमोर हात पसरविण्याची गरज भासणार नाही, अशी मागणी करीमखान आमदखान यांनी केली आहे.
