रिक्त पदांमुळे जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक रिक्त पदांमुळे आदीवासी बहूल असलेल्या जामोद प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याने गोरगरीब रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांच्या ६ पैकी ५ जागा रिक्त असून त्यात सोळकें नामक आरोग्य सेविका सुध्दा २ महिन्यांपासन रजेवर गेल्याने लसीकरण पुर्णता ठप्प झाले असून दवाखान्यात रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी एकही आरोग्य सेविका नसल्याने येथिल वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच रुग्णांना तपासून इंजेक्शन सुध्दा टोचावे लागत आहे जामोद येथील प्रा. आ. केंद्राला गेल्या ५ वर्षापासून आरोग्य सेवकच नसल्याने आरोग्य सेवकांविनाच आदीवासी बहुल असलेल्या जामोद प्रा आ केंद्राचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याने गोर गरीब रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

जामोद सह परिसरातील सातपुडा पर्वत विकास मिशन कट जामाद रांगेतील आदीवासी खेडे गावात घरोघरी जाऊन घरात कुणाला ताप आहे काय? असल्यास रुग्नांच्या रक्तांचे नमुने घेवून औषधी गोळ्या घरापर्यंत जाऊन बरेच वर्ष आदीवासींसह जामोद येथील गोर गरीबांना सेवा देणारे आरोग्य सेवक गजानन माहोदे यांचा कॅन्सरच्या आजाराने ५ वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या जागी अद्यापही प्रशासनाने आरोग्य सेवक दिला नसल्याने जामोद सह परिसरातील आदिवासी खेडेगावातील रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे याकडे मात्र वरिष्ठांचे साफ दुर्लक्ष होत आहे.

जामोद परिसरात वातावरणातील. बदलांमुळे हैराण झाले तापाच्यासाथिसह टाईफाईड मलेरिया, सर्दी पडसे, खोकल्यांचे रून मोठ्या प्रमाणात येत असतांनाही रिक्त पदांमुळे उपचारासाठी जाणाऱ्या अनेक गोर गरीब रूग्णांना उपचार न घेताच परत यावे लागत आहे. नाईलाजाने गोरगरीब आदिवासींना खाजगी दवाखान्यात जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे. असून याकडे मात्र रुग्ण कल्याण समिति व आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधिंचे साफ दुर्लक्ष होत आहे आता तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन जामोद प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या आरोग्य सेविकांसह आरोग्य सेवकांच्या जागा तात्काळ भराव्या अशी मागणी जामोद सह परिसरातील जनतेकडून होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)