![]() |
| जळीत घरातील व्यक्तींना आर्थिक मदत देताना फारुक शेख, सय्यद चाँद,भरत सपकाळे,कमलाकर बनसोडे हारून मेहबूब, वसीम करामत, अल्ताफ शेख , मुजाहिद खान आदि दिसत आहे. |
मुक्ताईनगर प्रतिनिधी शरीफ मनियार
देवघरातील दिव्या मुळे लागलेल्या आगीत जुने जळगाव भागातील आंबेडकर नगरात दोन घरांना भीषण आग लागून संसार प्रयोगी वस्तुसह दोन्ही घरे संपूर्ण आगीत खाक झाली होती.
जुने जळगाव मधेच हाकेच्या अंतरावर असलेल्या जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीने हिरालाल बाबुलाल बाविस्कर व शरद सुरेश सपकाळे यांच्या कडे जाऊन प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन बिरादरी आपल्या दुःखात सहभागी असून अल्लाह आपणास या दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढो अशी प्रार्थना करून त्यांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात आले.
यावेळी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्ष सय्यद चाँद,संचालक हारून मेहबूब ,अल्ताफ हुसेन, वसीम करामत ,मुजाहिद खान तसेच तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक भरत सपकाळे व नगरसेवक कमलाकर बनसोडे आदींची उपस्थिती होती.

