पुढे महाराष्ट्रात मजल दरमजल करीत राहुलजींसह भारत आणि प्रदेश यात्री, व परिसरातील प्रत्येक क्षेत्रातला, सामान्य माणूस चालत होता. खऱ्या अर्थाने राहुलजींसोबत महाराष्ट्र जोडला जात होता. तो जोडला जात असताना गोदी मीडियाने पसरविलेल्या राहुल गांधी यांच्या विरोधातल्या भ्रामक कथा, गैरसमज त्याच्या प्रत्येक पावलांखेरीज गळून पडत होते.
मराठवाड्यानंतर यात्रा विदर्भात प्रवेशित झाली. आणि राज्यातल्या भारत जोडो यात्रेची अखेरची सभा संत नगरी शेगाव येथे संपन्न झाली. त्या सभेला विराट विश्वरूप जनतेने आणून दिले. देशभरातील मीडिया उपस्थित झाला, व या सभेची दखल देशपातळीवर घेण्यात आली.
या सर्व प्रसंगानंतर अखेरचा प्रवास महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा सुरु झाला. बुलढ्याण्यातुन यात्रा पुढच्या प्रवासासाठी मध्यप्रदेशात पोहोचली, त्या वेळी बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी नियोजनासाठी राहुलजींनी माझे अभिनंदन करीत एक आपुलकीचे आलिंगन दिले.
ज्या नेत्याचा एक शब्द ऐकण्यासाठी कान आतुर असतात, त्या नेत्याने अभिनंदन करून आलिंगन दिल्यावर माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीच..!
भावना अनावर झाल्या आणि डोळे भरून आले, तीन महिन्यांच्या सततच्या कामाचा थकवा उडून गेला, अंगात नवं चैतन्य भिनले, हुकूमशाही आणि द्वेषाच्या विरोधात लढण्याचे बळ अंगात संचारले.
राहुलजींनी केलेलं अभिनंदन माझ्या एकट्याचे नसून, ही यात्रा यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या जिल्ह्यातील माझ्या तमाम सहकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आहे.
मा.आ. राहुल भाउ बोंद्रे, यांच्या Facebook Page wall वरून.
