मौलाना आझाद शाळा नांदुरा च्या अब्दुल अरहम मलिक च्या गगनभरारी निमीत्त भव्य सत्कार प्रतिनिधि राजिक शेख

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

नांदुरा: मुस्लिम स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन नांदुरा संचालित मौलाना आझाद उर्दु प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नांदुरा चा विद्यार्थी अब्दुल अरहम मलिक अब्दुल जावेद याने प्रधानमंत्री यसस्वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तिसरी रँक प्राप्त केली आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.त्याच्या या यशाबद्दल संस्था व शाळेतर्फे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात विधिज्ञ अँड बी.के.शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अँड अब्दुल रफिक व सचिव महंमद तौसिफ हे होते.याप्रसंगी संस्था व शाळेतर्फे अध्यक्ष मा.अँड अब्दुल रफिक व सचिव महंमद तौसिफ यांनी  अरहम मलिक ला मेडल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.शाळेतर्फे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी ही अरहम मलिक चा सत्कार केला.याप्रसंगी अब्दुल अरहम मलिक च्या वडिलांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच नांदुरा शहरातील गनमान्य नागरिक कलीम खान, महंमद जहीर,कलीम परवेज खान, जिया उल्ला खान,म.सिद्दीक,म.फहीम यांनीही अरहम मलिक चा सत्कार केला.तसेच मजीदिया हायस्कूल नांदुरा व चांदूर च्या मुख्याध्यापकांनी ही अरहम चा सत्कार केला. या प्रसंगी अँड अब्दुल रफिक यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिक्षकांनी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक वर्गात अरहम मलिक घडवावे व शाळेला नावलौकिक मिळवून द्यावा.ॲड.बी.के.शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की मौलाना आझाद शाळेकडेच नांदुरा शहरातील नागरिक गुणवान विद्यार्थी घडविण्याची क्षमता असलेली शाळा म्हणून पाहत आहेत.हा विश्वास शाळेने सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अरहम मलिक ने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष,सर्व शिक्षक व शाळेला दिले.कार्यक्रमाचे संचलन मोहसीन खान सर यांनी आभार प्रदर्शन जिकरूल्ला  खान सर यांनी केले.याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,मजीदिया हायस्कूल चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)