मुक्ताईनगर(प्रतिनिधी)मुक्ताईनगर येथील तालुका क्रिडा संकुल भुसावळ रोड सालबर्डी फाटा जवळ दोन दिवस फ्रेंडली क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते सदर क्रिकेट मॅच स्पर्धाचे उद्घाटन श्री हकिम आर चौधरी (संचालक राम रहीम रिअल इस्टेट कन्सल्टंट मुक्ताईनगर) यांच्या शुभहस्ते टॉस नाणे फेकून करण्यात आले यावेळी दोन दिवसीय क्रिकेट मॅच स्पर्धेमध्ये एकूण आठ टीम यांनी सहभाग घेतला होता परंतु दुसऱ्या दिवशी मुक्ताईनगर येथील VLPN ह्या टिम ने विजय प्राप्त केला यावेळी श्री हकीम आर चौधरी यांचे तर्फे वी एल पी एन टीम चे कॅप्टन श्री डॉक्टर निखिल जयस्वाल यांना 5001 रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले व रनर टीम मॉर्निंग 11Jone1 चे रिजवान सय्यद, सादिक खान, मुदसर आजाद, मोईन खान, यांना सुद्धा बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन रिजवान सय्यद,पोलीस कॉन्स्टेबल दयासर, रोहन अग्रवाल, मुदसर आझाद, अजगर मण्यार,नासिर मण्यार यांनी केले. एकूण आठ क्रिकेट टीम मध्ये स्वराज क्रिकेट क्लब, जॉन सी सी क्रिकेट क्लब, एदलाबाद क्रिकेट क्लब,मानेगाव क्रिकेट क्लब,शेमळदा क्रिकेट क्लब, वायला क्रिकेट क्लब,व विजय वीएलपीएन क्रिकेट क्लब इलेव्हन सी सी क्लब आदीने सहभाग घेतला. यावेळी अजीम खान,अनस खान, करण पथरोड,भोला तेजी, शेख अजगर मण्यार, श्री योगेश राणे, रोहन अग्रवाल यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गायकवाड यांनी केले तर आभार रिजवान सय्यद यांनी मानले यावेळी असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते....
