मुक्ताईनगर येथे शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या महाराष्ट्र व्यापी प्रचार रॅली ची बैठक नुकतेच मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली, सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मअंनिस चे राज्य सरचिटणीस विनायक सावले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मअंनिस चे राज्य कार्यवाहक श्री दिगंबर कटारे व मअंनिस जिल्हा प्रधान सचिव श्री प्रल्हाद बोराडे सर हे होते. सदर बैठकीत सर्वप्रथम मुक्ताईनगर चे म अंनिस चे तालुका अध्यक्ष श्री मोहन मेढे यांनी आलेले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत म अंनिस चे तालुका सचिव हकीम आर चौधरी यांच्या हस्ते माननीय श्री विनायक सावळे सर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले, ह्या बैठकीत महाराष्ट्र अंनिस चे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्य व संघटन मजबुती करणे बाबत मार्गदर्शन केले तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणे यासाठी कार्यकर्ते आज ही व्यक्तिगत तसेच संघटना पातळीवर अथक प्रयत्न करीत आहे व प्रत्येकाला जगण्याचा विवेकी दृष्टिकोन त्यांना प्राप्त व्हावा व विविध प्रकारचे शोषण थांबवण्यासाठी त्यांनी पुढे यावे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य संघटितपणे आम्ही सारे दाभोलकर विवेकाचे आवाज बुलंद करूया, अशा घोषणा देण्यात आल्या, समाजात असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वांनी सहभागी असे आवाहन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रात अनिस चे ३५वर्षा पूर्तीचे राज्य अधिवेशन दिनांक 27, 28 व 29 डिसेंबर 2024 आळंदी पुणे येथे होत असून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. ह्यावेळी म अंनिस चे राज्य कार्यवाहक श्री दिगंबर कटारे व म अंनिस चे जिल्हा प्रधान सचिव श्री बोराडे यांचे मुक्ताईनगर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून श्री मोहनजी मेढे, श्री विनोद खराटे, श्री चंद्रकांत रावये, कलीम मण्यार, आदींच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन आलेले पाहुण्यांचा स्वागत केले, मुक्ताईनगर तालुक्यात लवकर म अंनिस ची बैठक घेऊन नवीन सदस्य जोड अभियान सुरू करूया सदर कार्यक्रमाचे आभार हकीम चौधरी यांनी मानले, व येणारे पाहुण्यांना हकीम चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देण्यात आली.
