शहीद सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा धा.बढे ठाणेदारा मार्फत राज्यपालाकडे संविधान प्रेमींची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धा.बढे येथिल महात्मा शाहु फुले आंबेडकर चळवळीतील विचार मंच तथा संविधान प्रेमी अनुयायी  यांनी दी.२१ डिसेंबर रोजी  धा.बढे पो.स्टे चे ठाणेदार यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना दीलेल्या निवेदनातुन शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाल्या प्रकरणी चौकशी करुन मारहाण करणाऱ्या पोलीस अधिका-यावर  मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा
या सह संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या सोपान पवार याच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
अॕटो,व ईतर वाहनांची तोडफोड करणाऱ्या पोलीस कर्मचा-यावर गुन्हा दाखल करुन नुकसान भरभाई करुन द्यावी
शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय नौकरीत समाविष्ट करुन शहीद मृतकांचे आई वडीलांना ५० लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्या बद्दल केलेल्या व्यक्त्यव्याचा जाहीर निषेध करुन निवेदन दीले 
या निवेदनावर लक्ष्मण सोनु गवई,एस.पी.अहीरे, सुधाकर नारायण सोनोने, सुपडा राजाराम गरुडे, दीपक राणु हीवाळे, विश्वनाथ नथ्थु हीवाळे, रविंद्र रामदास चव्हाण, किसन तुकाराम इंगळे,भास्कर पंढरी गवई,गजानन हरी बोराडे, संजय नामदेव हीवाळे,संदीप अर्जुन खराटे आकाश प्रकाश गवई,महेंद्र जगन्नाथ अहीरे,समाधान दयाराम हीवाळे,राजु बळीराम पानपाटील,साहेबराव हरीभाउ डोंगरे,विशाल बाबुराव गवई,डी.टी.इंगळे, भिमराव सिरसाट, गजानन हीवाळे, यांच्या  सह्या असुन वरील मागण्याचे निवेदन धा.बढे ठाणेदारा मार्फत राज्यपालास देवुन केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी डाॕ.बाबासाहेंबाच्या अवमानास्पद व्यक्त्यव्याचा निषेध केला

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)