कोलते महाविद्यालयाचा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थानावर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. महाविद्यालयाच्या आयडिया इनोव्हेशन प्रोजेक्ट ची निवड राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे, या पाच प्रकल्पांमध्ये आमच्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रा. मोहम्मद जावेद सर यांच्या अद्वितीय कल्पना आणि नवकल्पनांमुळे या प्रकल्पाची निर्मिती शक्य झाली आहे. प्रा. सुधेश फरपट सर यांनी या प्रकल्पाला तांत्रिक आधार दिला, तर अॅडजंक्ट फॅकल्टी प्रा. विजय ठाटे सर यांनी प्रकल्पाचे इंस्टॉलेशन आणि प्रोग्रामिंग कार्य पूर्ण केले. या प्रकल्पाच्या प्रभावी सादरीकरणासाठी कॅडेट वैभव यांचा सहभाग घेतला गेला, ज्यांनी आपल्या जबाबदारीचे उत्कृष्ट पालन केले.

ही उल्लेखनीय कामगिरी महाविद्यालयाच्या नवकल्पनात्मक दृष्टिकोनाचे प्रदर्शन करते. या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे सर, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे सर, आणि संपूर्ण सहयोगी स्टाफ यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

या यशामुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि संपूर्ण मलकापूर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील, उपाध्यक्ष प्रदीपभाऊ कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते व सर्व महाविद्यालय व्यवस्थापनाने या प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)