समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचे आमरण उपोषण सुरू

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

  जळगाव जामोद तालुका प्रतिनिधि शोएब काजी
 समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफिस यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव जामोद यांना निवेदन दिला होता निवेदनात विविध मागण्या करण्यात आले होते जर आमच्या मागण्या कबूल ना झाल्यात  उपोषणाच्या ही इशारा दिला होता  परंतु नगर परिषदेने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि आमचे काम केले नाही, त्यानंतर आज समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी जळगाव जामोद नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग चार आणि पाच, सुभेदार पुरा आणि सुलतानपुरा, काझीपुरा येथे अंगणवाड्या सुरू करण्यात यावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी.  सुलतान पुरा सुभेदार पुरा आणि काजीपुरा  येथे नवीन पाण्याची पाईपलाईन टाकावी सुलतानपुरा आणि छोटी कबरस्थानच्या रस्त्यावरील हायमॉस लइटची व्यवस्था करावी. अशा विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी उपोषण सुरू केले आहे. सय्यद नफीसचे आमरण उपोषणाला राजकीय आणि सामाजिक लोकांसोबतच सर्व धर्माचे लोकही पाठिंबा देत आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)