आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पत्रकारांना मिळाले विम्याचे "कवच कुंडल"

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



*मराठी पत्रकार संघाच्या आव्हानाला साथ देत असंख्य पत्रकारांनी मेगा कॅम्पमध्ये सहभागी होऊन विमा कवच मध्ये केली नोंदणी*

*बुलढाणा :-   पत्रकार भवन बुलढाणा येथे आज दि 10 जानेवारी रोजी पत्रकारांच्या हितासाठी विमा कवच कुंडल याचे आयोजन करण्यात आले होते. या शुभ कार्यासाठी दि 9 जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने  आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला पत्रकारांनी मोठ्या संख्येने साथ दिली. पत्रकार भवन येथे येऊन सर्वांनी आपला विमा काढून घेतला आहे. समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. समाज हिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी, त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी, या उदात्त हेतूने बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड गायकवाड यांनी पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. 
दि 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित विम्याच्या मेगा कॅम्पमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून करण्यात आले होते. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंगराजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. आव्हानाला पत्रकारांनी साथ दिली मोठ्या संख्येने पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.
 मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून 06 जानेवारी मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करीत शिबिराचा लाभ घेतला होता. त्याचवेळी पत्रकारांना विम्याची संरक्षण असावे,  असा एक सूर पत्रकारांमधून उमटला होता.
आ. गायकवाड यांनी भारतीय डाक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याची पत्रकारांसाठी तरतूद केली.
पत्रकारांच्या समस्या वेदना काय असते हे आमदार संजय  गायकवाड यांनी सांगितले आहे. पत्रकार हा लढा देत असतो मात्र संकटाच्या काळी त्याच्यावर काही दुर्घटना घडल्यास त्याचा परिवार हा उघड्यावर पडतो त्यामुळे त्यांच्यावर अशी विपरीत वेळ येऊ नाही म्हणून यांनी विमा कवच आयोजित केला.
पत्रकारांसाठी 10 लाख रूपयांचा अपघाती विमा आ.गायकवाड यांच्या माध्यमातून उतरविण्यात आला आहे यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व  आल्यास 10 लाख रूपये, दवाखान्याचा खर्च 60 हजार रूपये, मुलाच्या शिक्षणाचा खर्च 1 लाखा रूपयापर्यंत, अ‍ॅडमिट असेपर्यंत 1 हजार रूपये, ओपीडी खर्च 30 हजार रूपये अशा प्रकारचे स्वरूप भारतीय डाक विभागाच्या अपघात विमा योजनेचे आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)