मलकापूर : राज्यात सुरु भारनियमन सुरु असतानाच, मलकापुरात भारनियमानाच्या विरोधात तसेच शिवसेना उबाठा दिपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून महावितरण कार्यालयाला घेराव घालण्यात आला.
शिवसेना उबाठा दिपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच गणेश सुशीर विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून दुधलगाव, लोणवडी, आळंद या गावातील कास्तकार तथा शिवसैनिकांनी भारनियमानाच्या विरोधात महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आज (गुरुवार) मोर्चा काढला. जमावाला कार्यालय हादरले सुरक्षा रक्षकांनी गेट बंद केले, मात्र कास्तकारांनी कंपांडवॉलच्या जाळ्यातून प्रवेश मिळवला, त्यानंतर महावितरण विजेची अनियमित्ता, व्होल्टेज ड्रॉप, डिपी चे साहित्य वेळेवरण न प्राप्त होणे, ३ महिन्यापासून एकच वेळापत्रक, निपाणा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेहमीचे टोलवाया टोलविचे उत्तरे ऐकून त्रस्त झालेले कास्तकारांना रोषाला कार्यकारी अभियंता यांना सामोरे जावे लागले.
शेतकरी विजे वाचून तफडफत असताना तुम्ही एसीमध्ये बसताच कसे, असे म्हणत त्यांच्या दालनात "पाणी उपलब्ध असून विजे अभावी" वाळलेल्या मक्याच्या पेंढ्या कार्यालयात सर्वत्र शिसेनिकांनी फेकल्या त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केल्या. तसेच सर्व कार्यालयाच्या आवारात देखिल वाळलेल्या मक्याच्या पेंढ्या कास्तकारांनी फेकल्या. संतप्त शेतकऱ्यांना पाहून कार्यालयातून पोलिसांना बोलावण्यात आले. कार्यकारी अभियंता श्री. तायडे हे कार्यालयात हजर नव्हते. पोलिस आल्या नंतर काही काळात कार्यकारी अभियंता हजर झाले.
अनेक वेळ शिवसैनिक घोषणा देत होते. हा गोंधळ बऱ्याच वेळ सुरुच होता. काही वेळानंतर कार्यकारी अभियंता यांनी शिवसेना उबाठा दिपक चांभारे पाटील यांच्याशी चर्चा केली.
तसेच दुधलगाव येथील रमेश पाटिल, मल्हारी, कोलते, अनंत नारखेडे व आळंद येथील खापोटे डिपी यांना लागणारे साहित्याची डिमांड तत्काळ पूर्ण करण्याबाबत व सर्व समस्या दोन दिवसात निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले.
यावेळी देविदास श्रीराम वराडे, शरद रामभाऊ पाटील, अनंत वासुदेव पाटील, महेंद्रसिंग चंद्रपालसिंग गेहलोद, मनोज हरिभाऊ पाटील, गजानन रमेश पाटील, अनंत अरुण नारखेडे, संदीप रामा पाटील, अनंत प्रल्हाद पाटील, प्रदीप रामा पाटील, अनीत पाडुरंग पाटील, नरहरी शंकर पाटील, किरण सुर्यकांत कोलते, दिपक सुर्यकांत कोलते, विजय ओंकार नारखेडे, उध्दव निवृत्ती पाटिल, गजानन वामन नारखेडे, संतोष रामदास धनगर, गणेश सिंग हरपाल सिंग दीक्षित, सचिन सोपान पाटील, भगवान विलास पाटील, संदीप मुकुंद नारखेडे, निशांत नारायण नारखेडे, दीपक सूर्यकांत कोलते, सुनिल लक्ष्मण पाटील, बाळकृष्ण लक्ष्मण नारखेड, मिलींद गगलाय नारखेडे, गणेश रामकृष्ण इंगळे, मरलीधर जगन्नाथ नारखेडे, जुबेर खान, कादर शेख, आसीम खान व इतर शिवसैनिक तथा कास्तकार हजर होते.
Box
*शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी ग्राहकाप्रमाणे नाही तर माणुसकी प्रमाणे कास्तकारांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या. तसेच संपूर्ण तालुक्यात परत कोणत्याच कास्तकाराला त्रास झाला नाही पाहिजे याबाबत कार्यकारी अभियंतांना सज्जड दम दिला, असे न झाल्यास येणाऱ्या पाच ते सहा दिवसात संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा शिवसेना काढणार असे ठणकावून सांगितले.*
