एनबीए मानांकनप्राप्तीबद्दल प्राचार्य डॉ अनिल खर्चे यांचा सत्कार महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाची भर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर: पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन एनबीए मानांकन मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशस्वी वाटचालीचा सन्मान करण्यासाठी इंजिनिअरिंग असोसिएशनचे सेक्रेटरी प्रोफेसर बंदी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांचा विशेष सत्कार केला. या गौरव सोहळ्यात महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, आरती कोलते मॅडम आणि  पी. के. करांडे सर यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली.

एनबीए मानांकन प्राप्त करणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. या पार्श्वभूमीवर, असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ नॉन-एडेड प्रोफेशनल कॉलेजेस (महाराष्ट्र) ही राज्यस्तरीय नोंदणीकृत संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्रातील विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालयांसाठी (अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी, टाऊन प्लॅनिंग, डिझाईन, अप्लाईड आर्ट्स अँड क्राफ्ट्स, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन इ.) ही असोसिएशन समर्पित आहे.

ही असोसिएशन महाविद्यालयांच्या गुणवत्तापूर्ण दर्जा वाढवण्यासाठी विविध सेमिनार, कॉन्फरन्स आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याचबरोबर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, आर्किटेक्चर कौन्सिल ऑफ इंडिया, विद्यार्थी अनुदान आयोग, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचालनालय, शुल्क नियामक प्राधिकरण, प्रवेश नियमक प्राधिकरण, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व संबंधित विद्यार्थी ठिकाणचे प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी संस्थाचालक आणि महाविद्यालयांसोबत सतत संपर्कात असते.


एनबीए मानांकन मिळाल्याने महाविद्यालयातील शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन, रोजगार आणि उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.

सत्कार समारंभात बोलताना प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रशासन यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, "हे यश संपूर्ण महाविद्यालय कुटुंबाने मिळवले असून, आम्ही भविष्यात आणखी नवीन शैक्षणिक उंची गाठण्याच्या दिशेने प्रयत्नशील राहू."


महाविद्यालयाने या यशाच्या जोरावर शैक्षणिक नवोपक्रम, संशोधन प्रकल्प आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा, औद्योगिक सहकार्य आणि नव्या संशोधन संधी उपलब्ध होणार आहेत.

महाविद्यालयाच्या या महत्त्वपूर्ण यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, संपूर्ण संस्था परिवाराने या यशाचा जल्लोष साजरा केला. एनबीए मानांकनाच्या या उल्लेखनीय टप्प्यानंतर, महाविद्यालयाचा प्रवास आणखी उच्च गुणवत्तेकडे होईल, असा विश्‍वास महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब पाटील व उपाध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ कोलते यांनी व्यक्त केला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)