यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत डॉ अब्दुल करीम सालार साहब

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
     इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित अब्दुल मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल बोरनार  येथे गुरुवार दि.13 फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार साहब होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी शोएब पटेल यांची तीलावत ने झाला. शेख रोशन सर यांनी चे अध्यक्ष ची निवड केली तसेच मजहर खान सर यांनी त्याला अनुमोदन दिले. तराना-ए-इकरा बुशरा अँड ग्रुप यांनी सादर केलं. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेचे मुख्याध्यापक सलीम शाह सर यांनी मांडली.    इयत्ता नववी चे विद्यार्थिनी नाजीया व त्यांचे सहकार्यांनी  पाहुण्यांचे स्वागत गीत सादर केले. इयत्ता चौथी ते दहावीपर्यंत प्रथम ते तृतीय क्रमांक मिळालेले विद्यार्थ्यांच्या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार व पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन शेख रोशन सर व शेख अमीर सर यांनी केले. स्पोर्ट डे चे पारितोषिक चे सूत्रसंचालन फिरोज खान सर व शेख आबीद सर यांनी केले. आरिफ खान सर यांनी बेस्ट स्टुडन्ट व स्टार ऑफ इकरा यांची घोषणा केली. कार्यक्रम चे पूर्ण सूत्रसंचालन शेख जव्वाद अंजुम सर यांनी केले. यावेळी डॉक्टर अब्दुल करीम सालार साहेब, अमिन दादा बादलीवाला साहेब, नबी दादा साहेब, वाहब मलिक साहेब,इरफान सालार साहेब, रमिज बादलीवाला साहेब, व इतर मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्व सांगितले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अब्दुल करीम सालार साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी कठोर परिश्रम करण्यास सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आकिब सर, मुश्ताक भाई,युसुफ भाई, शब्बीर भाई,आपा यांनी परिश्रम केले. शेवटी आभार सादिक सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल अध्यक्ष साहेब व इतर सभासदांनी मुख्याध्यापक व सर्व स्टाफचे अभिनंदन केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)