. या बैठकीत मार्टि संस्थेच्या पदभरती, नवीन लेखा शीर्ष उघडणे, कंपनी कायद्यानुसार धोरण बनवणे आणि मुख्यालयासाठी लवकर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये नेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश देण्यात आला. या बैठकीत अल्पसंख्यांक विकास विभागाचे अधिकारी, उपसचिव शेनाय साहेब, कक्ष अधिकारी अंधारे साहेब आणि वक्फ बोर्डचे सीईओ जुनेद खान, तसेच विविध अधिकारी यांची उपस्थिती होती.
तसेच, मार्टिन कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आला. मार्टि कृती समितीचे अध्यक्ष अँड अझर पठाण, सरचिटणीस वसिम कुरेशी, सचिव शहबाज पठाण, सर आसिफ, सहसचिव नबील उजमा आणि अभ्यास सल्लागार सदस्य शाहेबाज मनियार यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीद्वारे मार्टि संस्थेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची #अपेक्षा आहे. या निर्णयांमुळे संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि सुधारणा होऊन, अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासासाठी अधिक प्रभावी पाऊल उचलले जाईल.
