निरंकारी बाबा हरदेव सिंग जी महाराज
मलकापूर आजच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये रक्त पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. रक्त हे कुठल्याही फॅक्टरीत बनत नसल्यामुळे रक्ताच्या साठ्या बद्दल चिंता व्यक्त केली जात आहे . गरोदर महिला, नवजात बालक, डायलिसिस वाले पेशंट यांना रक्ताची खूप गरज असते हीच गरज ओळखून संत निरंकारी मंडळ दरवर्षी संपूर्ण भारत देशामध्ये तसेच विदेशामध्ये सुद्धा लाखो युनिट रक्त संकलन करून पेशंटच्या उपयोगी येते याच अनुषंगाने संत निरंकारी मंडळ दिल्ली ब्रांच मलकापूरच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जात असते तर या वेळेस रक्तदान शिबिर हे रविवार दिनांक. 16 मार्च 2025 या रोजी वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत श्रीमती के .के अग्रवाल कला वाणिज्य महाविद्यालय बुलढाणा रोड मलकापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी तसेच नवयुग मित्रांनी या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा असे आव्हान संत निरंकारी मंडळ दिल्ली ब्रांच मलकापूरचे इन्चार्ज आदरणीय दयाळूजी चव्हाण यांनी केले आहे
