बुलडाणा जिल्ह्यात आय.सी.टी. उपक्रमामुळे संगणक शिक्षणाचा विस्तार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

बुलडाणा  समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 2273 शाळांमध्ये आधुनिक संगणक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या असून, यात जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि शासकीय आश्रमशाळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक शाळेत प्रशिक्षित संगणक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आदरणीय श्रीमती आर. विमला मॅडम यांच्या पुढाकाराने आय.सी.टी. (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात 37 शाळा आणि 2 ब्लॉक संसाधन केंद्रे (BRC) या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. खरात साहेब, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्री. देवकर साहेब आणि समग्र शिक्षा विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) श्री. म

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)