मलकापूर - जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 8 मार्च 2025 रोजी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे इंडियन मेडिकल असोसिएशन, मलकापूर, महाविद्यालयातील मेडिकल सेल आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या समस्या आणि त्यांच्या निवारणावर आधारित विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मलकापूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे नामवंत डॉक्टर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांमध्ये डॉ. अरुण येवले, डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. नितीन बऱ्हाटे, डॉ. कृष्णा पाटील, डॉ. जयश्री खर्चे, डॉ. सुरेखा बोरले, डॉ. स्नेहा कोलते, डॉ. छाया देशमुख, डॉ. माधुरी वराडे, डॉ. सोनाली बऱ्हाटे, डॉ. रिया चोपडे, डॉ. सई चोपडे, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. स्वाती फिरके यांचा समावेश होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महिलांना भेडसावणाऱ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक, सामाजिक आणि वैयक्तिक समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ठेवलेल्या समस्या बॉक्समधील प्रश्नांवर डॉक्टरांनी समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले, प्रा. रमाकांत चौधरी, मेडिकल सेल इन्चार्ज प्रा. ऋतुजा पाटील, प्रा. आचल गोळे, प्रा. भाग्यश्री नारखेडे यांनी विशेष मेहनत घेतली. महिला दिनाचा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरला.
