मुक्ताईनगर(प्रतिनिधी)मुक्ताईनगर येथील सकल मुस्लिम समाज वतीने वक्फ संशोधन बिल 2024 ला विरोध व ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ला समर्थन म्हणून आज शुक्रवारची नमाज पठण नंतर हातावर काडीपट्टी बांधून सदर बिलाचा निषेध करण्यात आले. केंद्र सरकार द्वारा बोर्ड नियंत्रित करणारे व 1995 च्या वक्फ कानून अनुसाधन विधेयक 2024 चे संशोधन बिल पारित करण्यासाठी संसदेत विधायक आणून पास करण्याचे प्रयत्न सुरू असून आम्ही त्याला विरोध करतो व वक्फ बिल मध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल आम्हाला मान्य नाही म्हणून आज आम्ही सकल मुस्लिम समाजाच्या वतीने वक्फ बिल 2024ला विरोध करतो व महामहीम राष्ट्रपती द्वारा मागणी करतो की वक्फ संशोधन बिल 2024 ला समस्त मुस्लिम समाजाचे विरोध आहे म्हणून सरकारने मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेऊन सदर बिल रद्द करावे व एक मोखी मागणी आहे व आम्ही या निवेदन द्वारे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ला समर्थक करतो.
रद्द करा......रद्द करा वक्फ बिल रद्द करा....अशा घोषणाद्वारा केंद्र सरकारचे वक्फ बिल बाबत धोरणाचे विरोध करतो.सदर निवेदन देताना मुस्लिम मणियार बिरादरी चे अध्यक्ष हकीम आर चौधरी,शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान,शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शकील सर,मणियार मस्जिद चे मुतवाली कलीम मणियार, मणियार मस्जिद चे खजिनदार अहमद ठेकेदार, लुकमान बेपारी, शकील मेंबर(माजी ग्रा.पं सदस्य) तौकीर अहमद तौकीर, उजेफ खान, शोएब खान ,समीर शेख नजीर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
