युवा उद्योजक व्यापारी तरुणांची लाखो करोडोंनी फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा दिपक चांभारे पाटील यांनी केला पर्दाफाश

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

शहरात नोकरीचे आमिष तसेच ऑनलाईन उद्योग व्यवसायाची जाहिरात देऊन काहींना गंडा घालणारी टोळी सक्रिय आहे. यामध्ये शेतकरी व्यापारी तसेच सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. गेल्या काही महिन्यापासून मलकापूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरात या टोळीने बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे.

मलकापूर परिसरात सातत्याने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहे. परिणामी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. परिणामी आत्महत्यांच्या ही घटना घडल्या आहेत. तरीसुद्धा आर्थिक फसवणुकीची गुन्हे थांबता थांबेना. शिवाय प्रशासन सुद्धा अशा आर्थिक गुन्ह्यांवर कायमस्वरूपी उपाय किंवा अंकुश घालण्यात असफल ठरले आहे. उद्योजक, व्यापारी शेतकरी मायबाप, यांची होणारी आर्थिक लूट किंवा फसवणूक शिवसेना कधीही खपून घेणार नाही अशी भूमिकाच दिपक चांभारे पाटील, शिवसेना, तालुका प्रमुख यांनी घेतली आहे.

आज पर्यंत मलकापुरात आर्थिक फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून  जग्गू डॉन, पप्पू डॉन, विविध पतसंस्था, बँका यांनी आजवर अनेक नागरिकांना लुटले आहेत.

अशातच आणखी एक महाशय व त्याच्या परिवारातील काही सदस्य "नटवरलाल" च्या भूमिकेत आहेत. लीलाधर राठी, शैलेश लीलाधर राठी व कृष्णा प्रकाश राठी या एकाच कुटुंबातील सदस्यांनी "मां सचीया ट्रेडिंग" कंपनीच्या नावे फसवणुकीची आधुनिक पद्धत वापरून इलेक्ट्रॉनिक साधनांचा द्वारे मार्केटिंग करून बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर तसेच इतर राज्यात सुद्धा वेगवेगळ्या युवा उद्योजक, व्यवसायिकांची आर्थिक फसवणुक केली आहे. 

सदर नटवरलाल टोळी ही वेगळ्या व्यवसायांचे विविध संकेतस्थळावर जाहिराती देऊन फेसबुक वर प्रोफाइल बनवून ग्राहकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, जो रिक्वेस्ट स्वीकारेल त्याला उद्योग व्यवसायाची माहिती  देतात त्या उत्पादनाच्या विक्रीतून मिळणाऱ्या जास्तीत जास्त नफा बद्दल सांगतात.

राज्यातील प्रमुख शहरातील व्यावसायिकांना या टोळीने गंडा घातला आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये असूशिक्षित व्यक्तींपेक्षा सुशिक्षित व्यक्तींची संख्या मोठी आहे अशा टोळ्यांना आश्रय देणारे व आरोपींचे बळ वाढवणाऱ्यांच्या नाग्या वेळेतच ठेचल्या गेल्या नाही तर या टोळ्या फोपावतात व मोठे गुन्हे करण्यास त्यांची हिंमत वाढते. त्यामुळे अशा घातक वृत्तीपासून सावध राहिले पाहिजे यासाठी प्रशासनाने सायबर क्राईम व ऑनलाइन फसवणुकी संदर्भात लोकांना जनजागृती करण्यात आली पाहिजे.

Box 

दिपक चांभारे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, काही महिन्यांआधी या कथित "नटवरलाल" राठीच्या विरोधात काही युवा व्यापाऱ्यांनी माझ्या कडे तक्रारी दिल्या होत्या, त्या अनुषंगाने मी खोलात जाऊन चौकशी केली असता मला कळाले या नटवरलाल ने अनेक युवा उद्योजकांना लाखो नाही तर करोडो रुपयांच्या घरात गंडवले आहे. हा नटवरलाल आधुनिक युगातील ऑनलाइन साईट जसे की इंडिया मार्ट, जस्ट डायल यावरून नवीन उद्योजकांची माहिती घेतो व त्यांच्याशी संपर्क साधतो तसेच त्यांच्या व्यवसायाला भेट देतो या कामात त्याने काही डमी दलालांची स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे. ही संपूर्ण टीम युवा उद्योजकांचा विश्वास संपादन करून त्यांना मालाची ऑर्डर देते व जेमतेम रक्कम ऍडव्हान्स म्हणून देते व उर्वरित रक्कम वायदा बाजाराप्रमाणे देण्याची कबुली देतात. हे नवीन उद्योजक ठरल्याप्रमाणे मालाची डिलिव्हरी देतात. मात्र हा "नटवरलाल" डिलिव्हरी मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास आधी टाळाटाळ करतो नंतर काही दिवसांनी त्या युवकांशी संपर्क कक्षातून गायब होतो, बुलढाणा अर्बन बँकेचे करंट अकाउंटचे चेक देतात. असे बरेच नवनवीन फंडे करतो नंतर मिस्टर इंडिया प्रमाणे गायब होते व नवीन उद्योजक शोधतो.
      तक्रारी तर तशा बरेच आहेत त्यापैकी काही
1. गणेश सुशीर हा युवा उद्योजक दुधलगाव मलकापूर तालुक्यातील  राहणार असून याने मका भाड्याच्या व्यवसाय सुरू केला होता त्याला सव्वा लाख रुपयांनी गंडविले आहे 
2. छत्रपती संभाजीनगरचा दियाब इंडस्ट्रीज चे दियाबभाई शेख याचा सरकी ढेप चा व्यवसाय आहे याला या नटवरलाल ने इंडिया मार्ट च्या माध्यमातून संपर्क केला तेव्हा त्याने बोदवळच्या रहिस बीरम शेख च्या माध्यमातून जवळपास साडेआठ लाखांनी गंडविले 
3. अक्षय अँड शंकर a s एंटरप्राइजेस ही चाकण पुणे येथील उद्यमी आहे व बेसन चा सप्लाय करतात सदर फर्मला फेसबुक वरून संपर्क केला व गंडवले
4. सागर मधुकर पवार सागर एजन्सी पिंपरी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव यांना सुद्धा फेसबुक वरून संपर्क करून गंडविले आहे. धरणगाव तालुक्यात तर एक "मलकापूर फ्रॉड" म्हणून व्हॉटस् अँप ग्रूप आहे तेथे याचे प्रचंड लाभार्थी आहे.
5. कुणाल बांदूरकर पाटील यांचा हरदा मध्य प्रदेश येथे व्यवसाय आहे त्यांची तर प्रचंड मोठी रक्कम आहे.
असे अनेक लेखी तक्रारी आमच्या कडे प्राप्त झालेले आहे हे सर्व पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहेत. तसेच शिवसेने तर्फे सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करतो की मलकापूरच्या या "नटवरलाल" राठी व त्याच्या मुलांशी व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी  व्यवहार करतांना अती दक्षता घ्यावी व ज्यांना ज्यांना राज्यातून किंवा बाहेरील राज्यातून गंडविले आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांना न्याय देऊ.
जय हिंद जय महाराष्ट्र🚩

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)