पद्मश्री डॉ व्ही बी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कॅंपस प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ३२ विद्यार्थ्यांची टेनेकॉ क्लीन एअर इंडिया प्रा. लि पुणे येथे यशस्वी निवड

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापूर– पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योग व शिक्षण यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने कॅंपस प्लेसमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये टेनेकॉ क्लीन एअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या प्रतिष्ठित कंपनीसाठी भरती प्रक्रिया पार पडली. टॅलेंट कॉर्प प्रा. लि., च्या एचआर प्रतिनिधी पूजा नागपूरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये एकूण १२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी विविध टप्प्यांमधून मुलाखती घेतल्या गेल्या, ज्यामध्ये तांत्रिक कौशल्य, व्यावसायिक ज्ञान, समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि संप्रेषण कौशल्ये तपासण्यात आली. या कठोर प्रक्रियेतून ३२ विद्यार्थ्यांची कनिष्ठ अभियंता या पदावर निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. २.८ ते ३.० लाखांचे आकर्षक वेतन देण्यात येणार आहे. प्लेसमेंट ड्राइव्हची सुरुवात प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उद्योग आणि शिक्षण यामधील दरी कमी करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक औद्योगिक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तांत्रिक कौशल्यांसह मृदु कौशल्ये  सुध्दा तितकीच महत्त्वाची आहेत. या वेळी टेनेकॉ क्लीन एअर इंडिया प्रा. लि. च्या भरती प्रक्रियेत विशेष योगदान दिल्याबद्दल पूजा यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्रा. संगीता खर्चे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन डॉ. वाय. ए. खर्चे, आयक्यूएसी प्रमुख प्रा. आर. एम. चौधरी, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. एस. आर. शेकोकर, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. व्ही. चोपडे, तसेच प्रा. मनीष आचेलिया, प्रा. एस. एम. भोळे, प्रा. ए. डी. तांबे आणि प्रा. प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करताना महाविद्यालयाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी सांगितले की, त्यांनी महाविद्यालयात घेतलेल्या प्रशिक्षण व कार्यशाळांमुळे त्यांना मुलाखतींमध्ये चांगली कामगिरी करता आली. महाविद्यालयाने दिलेल्या कौशल्यविकास कार्यक्रमांचा आणि ट्रेनिंग मॉड्यूल्सचा त्यांना विशेष फायदा झाला.

महाविद्यालयाने सतत उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नियमितपणे कॅंपस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्याची परंपरा चालना मिळत आहे. महाविद्यालयाने पुढील काळात अजून मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्राशी जोडणी करून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन रोजगार संधी निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना फक्त नोकरी मिळवून देण्यावर भर न देता त्यांना उद्योजकता आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्याचाही संकल्प संस्थेने केला आहे. "उद्योग आणि शिक्षण यांच्यातील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे," असे मत महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते व खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे यांनी यावेळी व्यक्त केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)