महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व लाडक्या बहिणींना ऐकविसशे रुपये अनुदान देण्याची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शिवसेना (उ.बा.ठा) मलकापूर शहर व तालुका ची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापुर:-  महायुती सरकारने घोषणा केल्यानुसार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण माफी केली नसुन शेतकऱ्यांच्या तोंडाला महायुती सरकारने पाने पुसली आहे,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा व लाडक्या बहिणींना निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये मासिक अनुदान द्या, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या  प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, बरेच रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही,शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रेशन चे पैसे सुद्धा जमा होत नाही, त्यांना  धान्य उपलब्ध करून द्या व शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रेशनचे तात्काळ पैसे जमा करा अन्यथा शिवसेना लोकशाही मार्गाने आंदोलन करेल होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनावरच राहील असा इशारा निवेदनावर द्वारे देण्यात आला आहे निवेदनावर विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, शकील जमादार, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले,किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, माजी नगरसेवक पांडुरंग चिम,शाम जाधव,सै. तोफिक, शेख सद्दाम, इसाक तेली सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)