असे होईल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदरीकरण म फुले-आंबेडकर जयंतीचा कालखंड लक्षात घेता तात्काळ पुतळा सौंदर्यकरणाला सुरुवात करा अन्यथा तीव्र आंदोलन भाई अशांत वानख

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापूर:(४) येथील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर सौंदर्यकरण कामाला तात्काळ सुरुवात करा ! अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा "समतेचे निळे वादळ" संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी देताच न प अधिकारी हजर झाले व उद्याच कामाला सुरुवात करू असे स्पष्ट आश्वासन  दिले.
                याबाबत सविस्तर असे की, न प सभागृहात सदर सौंदर्यकरणाचा प्रस्ताव आम्ही पारित करून दीर्घकाळ लोटला असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने आज रोजी "समतेचे निळे वादळ" चे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे व काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल, राष्ट्रवादीचे डॉ अशोक सुरडकर, भाजपा दलित आघाडीचे कुणाल सावळे,रफिक भाई अबला,तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, दिलीप इंगळे, दीपक मेश्राम, शालिग्राम ठाकरेअरुण बोदडे, शांताराम इंगळे, विजय सोनवणे, रवींद्र भारसाकडे, राजेश रायपुरे आदी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सदर परिसराला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी नगरपरिषद उपमुख्य अधिकारी श्री विठ्ठल भुसारी, कर निरीक्षक श्री नंदकिशोर आंधळे, आरोग्य निरीक्षक तथा पाणीपुरवठा अभियंता श्री अजय बयस, संतोष पाटील, बांधकाम कंत्राटदार श्री अक्षय बन्साली व इतर अधिकारी कर्मचारी तातडीने पुतळा परिसरात हजर झाले. या ठिकाणी असलेले वाटर फिल्टर तातडीने दुरुस्त करणे परिसराची साफसफाई करणे वाटर प्लांट स्वच्छ करून सुरू करणे तसेच प्रत्यक्षात पुतळा सौंदर्यकरण कामाला उद्याच सुरुवात करण्याचे आदेश उपमुख्याधिकारी श्री विठ्ठल भुसारी यांनी संबंधितांना दिले उपमुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर होऊन स्पष्ट आश्वासन दिल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मात्र उद्या दि.५  मार्च रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास "समतेचें निळे वादळ" या संघटनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)